चित्रपटाच्या नव्या प्रयोगाबद्दल सांगताहेत प्रतिभावंत अभिनेता शशांक शेंडे - Shashank Shende in Soyarik
🎬 Watch Now: Feature Video
शशांक शेंडे हे त्यांच्या अफलातून भूमिकांसाठी ओळखले जातात. आता ते निर्मात्याच्या भूमिकेतही शिरले आहेत. ते निर्माते असलेला ‘सोयरीक’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘रिंगण’ चे दिग्दर्शक मकरंद माने करीत आहेत आणि त्यांनी या चित्रपटात कलाकारांसोबत एक वेगळा प्रयोग केला आहे. या चित्रपटात प्रत्येक कलाकाराने आपापली भूमिका ‘इम्प्रोव्हाईज’ केली आहे. ‘सोयरीक’ चे निर्माते आणि अभिनेते शशांक शेंडे यांनी आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांच्यासोबत संवाद साधला त्याचा हा विडिओ.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST