Video : शॉर्टसर्किटमुळे १३ एकरातील ऊसाला आग, लाखो रूपयांची हानी - साताऱ्यात आग
🎬 Watch Now: Feature Video
कराड (सातारा) - कराड तालुक्यातील चचेगावमध्ये शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत १३ एकरातील ऊस जळाला. यामध्ये शेतकर्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे. शुक्रवारी दुपारी चचेगावमधील पाळक नावाच्या शिवारातील उसाला भरदिवसा आग लागली. या आगीत १३ एकरातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या घटनेत १२ शेतकर्यांची आर्थिक हानी झाली आहे. तलाठ्यांसह महावितरणच्या अधिकार्यांनी या घटनेचा पंचनामा केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST