... अन्यथा कर्नाटकच्या बसेस महाराष्ट्रात येऊ देणार नाही, युवासेनेचे नागपुरात आंदोलन - नागपुरात आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13953166-430-13953166-1639931188446.jpg)
नागपूर - कर्नाटक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे विटंबना ( Shivaji Maharaj Statue Defacement ) झाल्याच्या निषेधार्थ युवासैनिकांनी ( Yuva Sainik of Nagpur ) उपराजधानी नागपुरात आंदोलन केले. हे आंदोलन ( Yuvasena agitation in nagpur ) शहराच्या गांधी गेट परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर करण्यात आले. यावेळी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा ( Karnataka CM ) निषेध करण्यात आला. कर्नाटक सरकारने घटनेबाबत माफी मागावी अन्यथा कर्नाटकच्या बसेस ( KSRTC Buses ) महाराष्ट्रात येऊ देणार नाही, आल्यास तोडफोड करू, असा इशारा युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांनी दिला आहे.