अन्यायकारक बदली केल्यामुळे शिक्षिकेचा संताप; सीईओंच्या दालनासमोर ठिय्या - woman teacher agitation
🎬 Watch Now: Feature Video

नांदेड - अन्यायकारक बदलीच्या निषेधार्थ महिला शिक्षिकेने आज (गुरुवार) जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन केले. जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या दालनासमोर महिलेने दिवसभर ठिय्या दिला. महानंदा पवळे असे शिक्षिकेचे नाव आहे. दरम्यान, बदली अन्यायकारकरित्या हिमायतनगरला करण्यात आली आहे. ही बदली रद्द करण्यासाठी या महिलेने दिवसभर जिल्हा परिषदेत ठाण मांडले. या प्रकारामुळे बदल्यातील गोंधळ समोर आला आहे.