ETV Bharat / sports

कांगारुंना पराभूत करत आफ्रिकन संघ 2023 च्या विश्वचषकातील पराभवाचा बदला घेणार? AUS vs SA मॅच 'इथं' पाहा लाईव्ह - AUS VS SA 7TH MATCH LIVE

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा सातवा सामना आज ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघांत रावळपिंडी इथं खेळवला जाणार आहे.

AUS vs SA 7th Match Live
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Feb 25, 2025, 5:01 AM IST

रावळपिंडी AUS vs SA 7th Match Live Streaming : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा सातवा सामना आज 25 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता रावळपिंडीतील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यात टेम्बा बावुमा दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करत आहे. ऑस्ट्रेलियाची कमान स्टीव्ह स्मिथच्या हातात आहे.

दोन्ही संघांचा पहिल्या सामन्यात विजय : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघानं स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात शानदार कामगिरी करत इंग्लंडला पराभूत केलं होतं. संघानं 351 धावांचं विक्रमी लक्ष्यही गाठलं. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका देखील काही कमी नाही. पहिल्या सामन्यात त्यांनी अफगाणिस्तानला एकतर्फा पराभूत केलं होतं. ते पॉइंट्स टेबलमध्येही पहिल्या क्रमांकावर आहेत. अशा परिस्थितीत, या दोन्ही संघांमध्ये अव्वल स्थान मिळवण्यासाठी अटीतटीचा सामना होईल.

दोन्ही संघांची मजबूत फलंदाजी : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांकडे फलंदाजीचे विभाग खूप मजबूत आहेत आणि त्यामुळं हा सामना खूप मनोरंजक बनू शकतो. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका दोघंही हा सामना जिंकून उपांत्य फेरीच्या दिशेनं एक मजबूत पाऊल टाकू इच्छितात. दुखापतींमुळं ऑस्ट्रेलियाचे अनेक प्रमुख खेळाडू या स्पर्धेत सहभागी नाहीत. परंतु लाहोरमध्ये इंग्लंडविरुद्ध ज्या पद्धतीनं त्यांनी विक्रमी लक्ष्य गाठलं त्यावरुन हे स्पष्ट झालं आहे की आयसीसी स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाला कमी लेखणं ही एक मोठी चूक असेल.

रावळपिंडीची खेळपट्टी कशी असेल : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. जिथं फलंदाजांकडून चांगली कामगिरी अपेक्षित असते. या मैदानावर नवीन चेंडू वापरताना वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. पण एकदा फलंदाज स्थिरावला की तो मोठी खेळी खेळू शकतो. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

वनडेमध्ये हेड-टू-हेड रेकॉर्ड कसा : दोन्ही संघ वनडे सामन्यांमध्ये 110 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. ज्यात दक्षिण आफ्रिकेनं 55 तर ऑस्ट्रेलियानं 51 सामने जिंकले आहेत. तीन सामने अनिर्णित राहिले आहेत आणि एकाचा निकाल लागला नाही, यावरुन हे संघ गेल्या काही वर्षांत किती समान आहेत हे दिसून येते. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेनं अलिकडच्या काळात काही उच्च-स्कोअरिंग सामने खेळले आहेत, ज्यात दक्षिण आफ्रिकेनं द्विपक्षीय मालिकांमध्ये आघाडी घेतली आहे. परंतु ऑस्ट्रेलियानं 2023 विश्वचषकातील सामन्यात आफ्रिकेला पराभूत केलं होतं. आता हा सामना जिंकत पराभवाचा बदला घेण्याचा आफ्रकेचा प्रयत्न असेल.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा सातवा सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा सातवा सामना 25 फेब्रुवारी (मंगळवार) रोजी रावळपिंडी येथील रावळपिंडी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक दुपारी 02:00 वाजता होईल.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा सातवा सामना कुठं आणि कसा पहावा?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे भारतात अधिकृत प्रसारण हक्क जिओस्टार नेटवर्ककडे आहेत. चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर विविध प्रादेशिक भाषांमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहू शकतात. याशिवाय, डिजिटल स्ट्रीमिंगचे अधिकार देखील जिओस्टार नेटवर्ककडे आहेत आणि सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर फ्रीमध्ये उपलब्ध असेल.

सामन्यासाठी दोन्ही संघ :

ऑस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अ‍ॅबॉट, अ‍ॅलेक्स कॅरी, बेन द्वारशीस, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंगलिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, अ‍ॅडम झांपा, कूपर कॉनोली

दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, मार्को जानसेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेव्हिड मिलर, वियान मुल्डर, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन, कॉर्बिन बॉश

हेही वाचा :

  1. टीम इंडियाविरुद्ध पराभवानंतर यजमान संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाहेर? काय आहे समीकरण
  2. मेगा स्टार चिरंजीवी ते जसप्रीत बुमराह... 'ब्लॉकबस्टर' सामना पाहण्यासाठी दिग्गजांची मैदानात मांदियाळी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.