चर्चा तर होणारच! विजयी पतीला खांद्यावर बसवून पत्नीने काढली मिरवणूक - पुणे ताज्या बातम्या
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-10298017-thumbnail-3x2-pune.jpg)
राजगुरुनगर (पुणे) - निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर विजयी उमेदवाराला त्याचे चाहते, कार्यकर्ते मोठ्या जल्लोषात खांद्यावर घेऊन मिरवणूक काढताना तुम्ही अनेकदा पाहिले असेल. पण पती निवडून आला म्हणून पत्नीने खांद्यावर उचलून मिरवणूक काढली, अशी घटना तुम्ही आजपर्यंत ऐकली नसेलच. मात्र अशी घटना घडली आहे पुण्यातील पाळू या गावात. खेड तालुक्यातील डोंगराळ भागातील पाळू गावात ग्रामपंचायत निवडणुकीत संतोष शंकर गुरव यांनी विरोधी उमेदवाराचा दणदणीत पराभव केला. संतोष यांच्या या विजयानंतर पत्नी रेणुका गुरव यांचा आनंद गगणाला भिडला आणि तिने चक्क आपल्या पतीलाच खांद्यावर घेऊन गावातून मिरवणूक काढत जल्लोष केला.