Watch : अहमदनगरमध्ये झाला सामाजिक आदर्श घालून देणारा विवाह; पुतणीचे पालकत्व स्विकारत दीराने बांधली भावजयीशी लग्नगाठ - Widow Woman Remarriage to husband brother
🎬 Watch Now: Feature Video
अहमदनगर - अकोले तालुक्यातील ढोकरी येथील निलेश शेटे वय 31 वर्षीय यांचे 14 ऑगस्ट 2021 ला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निधन झाले. ते हिरपाडा, जव्हार येथे आश्रमशाळेत सेवेत होते. आश्रमशाळेतील मुले , शिक्षक कोरोना बाधित झाले. त्यात नीलेश यांनाही कोरोनाची बाधा झाली. कोरोनातून सावरत असतानाच त्यांच्या मेंदूत गाठ झाली आणि नाशिक येथे उपचार घेताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांना 19 महिन्याची एक मुलगीही आहे. तरुण पत्नी पुनम अवघी 23 वर्षांची असताना कोरोनाने पतीला हिरावले. त्यामुळे पुनम समोर जीवनाचा सर्वात मोठा प्रश्न उभा होता. गावातील ज्येष्ठ व्यक्ती माधव तिटमे यांनी पुढाकार घेतला आणि लहान दिर समाधान याच्याशी विवाह लावून देण्याचा प्रस्ताव ठेवला. सर्वांशी चर्चा झाल्यानंतर समाजाची सर्व बंधने झुगारून अखेर दोघांचा विवाह पार पडला. ( Widow Woman Remarriage ) अकोले तालुक्यात दिर भाऊजाईचा सामाजिक आदर्श घालून देणारा विवाह नुकताच संपन्न झाला आहे.