VIDEO : तूर छाटणी करताना शेतकर्यांनी कोणती काळजी घ्यावी? - अमरावती तूर छाटणी यंत्र बातमी
🎬 Watch Now: Feature Video

अमरावती - वर्धा जिल्ह्यातील मांडवा येथे तूर छाटणी यंत्र तयार करण्यात आले होते. मात्र, शेतात तेच यंत्र त्याच्या जीवावर उठले. या यंत्राद्वारे झालेल्या अपघातामुळे एका तरुण युवकाचा मृत्यूही झाला होता. त्या पार्श्वभूमीवर तूर छाटणी करताना शेतकर्यांनी कोणती काळजी घ्यावी, यासंदर्भात अमरावती येथील शेतकरी विवेक गुल्हाने यांच्या शेतात अंबाई ॲग्रोटेकचे संचालक जयंत हिरपूकर यांनी प्रात्यक्षिकाद्वारे यासंदर्भात सखोल माहिती दिली.