वाशिम: चूल पेटवून, मोटारसायकलची तिरडी बांधून इंधन दरवाढीविरोधात आंदोलन - etvbharat Marath
🎬 Watch Now: Feature Video
वाशिम- दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल,आणि घरगुती गॅसच्या किमती वाढतआहेत. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला जगणेही कठीण झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने डिझेल, पेट्रोल आणि घरगुती दरवाढीचा निषेध करण्यासाठी वाशिममध्ये चूल पेटवून इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. तर मंगरूळपीर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या नेतृत्वात मोटारसायकलची तिरडी बांधून आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणा देत निषेध केला.