74वा स्वातंत्र्यदिन : पंढरीच्या विठुरायाला तिरंगी रंगाच्या फुलांची आरास - तिरंगी रंगाची आरास
🎬 Watch Now: Feature Video
पंढरपूर (सोलापूर) - देशभरात कोरोनाचे छायेत स्वातंत्र्य दिन शांततेत साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुख्मिणीच्या मंदिरातही आज (शनिवारी) स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विठुराय आणि रुख्मिणीसाठी वेगवेगळ्या आकर्षक अशा तिरंगा रंगाच्या फुलाची आरास करण्यात आली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने स्वातंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला झेंडु, शेवंती, लव्हेन्डर अशा विविध फुलांचा वापर करून देवाचा गाभारा, सोळखांबी सभामंडप, रुक्मिणी माता गाभारा तिरंगी रंगात सजवण्यात आला आहे. तसेच देवाच्या अंगावर तिरंगी उपरणे असल्याने देवाचे रुप अधिकच खुलून दिसत होते. मात्र, विठ्ठल मंदिर बंद असल्याने भाविकाना हे देखणे देवाचे रुप सोशल मीडियाच्या माध्यमातूनच पाहावे लागत आहे. पाहा, ही सुंदर आरास...