Murder Video Viral : नागपुरात योगेश धोंगडेचा खून; व्हिडिओ व्हायरल - नागपुरात योगेश धोंगडेचा खून
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर:- शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजी नगर परिसरात एका तरुणाची दोन ते तीन आरोपींनी मिळून हत्या केल्याची घटना घडली आहे. योगेश धोंगडे (३०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अनैतिक संबंधातून योगेशची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस उपायुक्त लोहित मातानी यांनी दिली आहे. योगेशच्या खुनाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात आरोपी योगेशवर सपासप वार करताना स्पष्ट दिसून येत आहे.