VIDEO : मेळघाटमध्ये आरोग्य विभागाकडून गावोगावी लसीकरण मोहिम - आरोग्य विभागाकडून मेळघाटमध्ये लसीकरण मोहिम
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - राज्यात ओमायक्रॉन या कोरानोच्या नव्या विषाणूंचा ( New Omicron Variant ) प्रादुर्भाव आढळल्याने राज्यात लसीकरण मोहीमेने पुन्हा ( Vaccination Campaign ) एकदा वेग घेतला आहे. अतिदुर्गम भाग असलेल्या अमरावतीच्या मेळघाटमध्ये ( Vaccination in Melghat Amravati ) मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम सध्या सुरू आहे. मेळघाट हा दऱ्याखोऱ्यामध्ये वसलेला भाग आहे. त्यामुळे डोंगर रांगा तुडवत येथे आरोग्यसेवा ( Health Department ) प्रशासनाला पोहोचावे लागते. अशाच पद्धतीने आता दर्या-खोर्यातून डोंगर रांगातून आशा सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य अधिकारी कर्मचारी गावोगावी जाऊन सध्या लसीकरण करतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. सुरुवातीला मेळघाटमधील आदिवासी बांधवांमध्ये लसीकरणाबद्दल शंका व भीती होती. परंतु मेळघाटमध्ये प्रशासनाच्या वतीने केलेल्या जनजागृतीनंतर आता आदिवासी बांधव लसीकरण मोहिमेला प्रतिसाद देत आहे.