नारायण राणेंना अटक करताना बंद खोलीत असा घडला हायहोल्टेज ड्रामा, पाहा VIDEO - narayan rane video news
🎬 Watch Now: Feature Video
रत्नागिरी - केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलेल्या मुख्यमंत्र्यांबद्दल विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यभर राणेंच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक अटकेसाठी पोहोचले होते. पण त्यांच्याकडे अटक वॉरंट किंवा कारवाईसाठी अन्य कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने राणेंनी खोलीतून बाहेर येण्यास नकार दिला होता. मात्र, आता नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्या बंद खोलीतला एक व्हिडिओ आता समोर आला आहे.
Last Updated : Aug 24, 2021, 5:11 PM IST