निसर्ग चक्रीवादळ : मुंबईत ३७ ठिकाणी झाडांची पडझड, तर 10 हजार 840 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले - निसर्ग चक्रीवादळ मुंबई
🎬 Watch Now: Feature Video
निसर्ग चक्रीवादळ आज दुपारच्या सुमारास अलिबागजवळील मुरुड समुद्रकिनाऱ्यावर धडकले. या वादळाचा मुंबईला जोरदार तडाखा बसलेला पाहायला मिळाला. अनेत ठिकाणी झाडे कोसळली आहेत आतापर्यंत मुंबई शहरात 12, पूर्व उपनगरात 7, पश्चिम उपनगरात 18, अशी 37 ठिकाणी झाडे आणि फांद्या तुटून पडल्याच्या घटनांची नोंद झाली. तसेच काही ठिकाणी झाडे कोसळल्याने वाहनांचे देखील नुकसान झाले आहे. दरम्यान, मुंबई शहर व उपनगरात 35 ठिकाणी तात्पुरते निवारे पालिकेच्या शाळांमध्ये सुरू करण्यात आले आहेत. समुद्रकिनारी राहणाऱ्या 10 हजार 840 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.