व्हिडिओ : झाडाच्या फांद्यांचा विजेच्या तारांना स्पर्श होऊन आग - Tree touch electricity wire fire kolhapur
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - सोसाट्याच्या वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे झाडाच्या फांद्यांचा विजेच्या तारांना स्पर्श होऊन किरकोळ आग लागल्याची घटना घडली. कोल्हापूर शहरातील राजारामपुरी चौथी गल्ली येथे ही घटना घडली. फांद्यांचा विजेच्या तारांना स्पर्श होऊन झालेल्या स्फोटानंतर या परिसरातील वीज पुरवठा काही काळ बंद करण्यात आला. या घटनेचे दृश्य स्थानिक नागरिकाने आपल्या कॅमेरात कैद केले. दरम्यान, वादळाचा प्रभाव संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत असून सकाळपासून एकसारखा पाऊस पडत आहे.