नागपूर-औरंगाबाद महामार्गावर ट्रक पलटी, काही वेळातच ट्रकने घेतला पेट - etv bharat marathi
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - नागपूर-औरंगाबाद महामार्गावर नागपूरकडून औरंगाबादकडे जाणारा एक ट्रक पलटी होऊन त्याने पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज (दि. 24) रविवार रोजी 9 वाजेच्या सुमारास घडली आहे. महामार्गाच्या मधोमध ट्रक पलटी होऊन पेट घेतल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील लागल्या होत्या. दरम्यान घटनेची माहिती मिळताच चांदुर रेल्वे येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. दरम्यान, या घटनेमुळे मोठी वाहतुक कोंडी झाली होती.