Video : बाप बाप असतो... मुलीच्या हट्टापायी जावयासाठी पाठवलं हेलिकॉप्टर - लग्नात हेलिकॉप्टर
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - हौसेला मोल नसतं असं म्हणतात. तसंच काहीसं नाशिक मध्ये बघायला मिळालं. नवरी मुलीच्या हट्टासाठी वडिलांनी जावयाला 5 किलोमीटर वरून लग्न मंडपात आणण्यासाठी चक्क हेलीकॉप्टर पाठवलं आणि या हौशी शेतकऱ्याची चांगलीच चर्चा रंगली. नाशिकच्या तालुक्यातील ढकांबे येथील प्रगतिशील शेतकरी गोपीनाथ बोडके यांची एकुलती एक उच्चशिक्षित कन्या वैष्णवी हिच्या विवाह सोहळा पार पडला. नवरदेवाला घेण्यासाठी चक्क एलिकॉप्टर गेलं आणि नवरदेवाच्या आनंदाला पारावर उरला नाही. लग्नानंतर याचं हेलिकॉप्टरने लेकीची आणि जावयाची पाठवणी करण्यात आली. माझ्या लग्नात काही तरी वेगळं हव असं मुलीने वडिलांना सांगितलं होतं. त्यानुसार वडिलांनी ही युक्ती लढवली.