कार चालकाने उघडला अचानक दरवाजा; विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू - Death of a young man on a two wheeler in Pimpari Chinchwad
🎬 Watch Now: Feature Video

पिंपरी चिंचवड (पुणे) - पिंपरी-चिंचवडमध्ये विरुद्ध दिशेने येणाऱ्या (Pimpari Chinchwad accident) दुचाकीवरील तरुणाला प्राण गमवावे लागले आहेत. ही घटना दिनांक 11 नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली आहे. या घटनेत राम बाळासाहेब बागल (24) यांचा मृत्यू झाला आहे. तर, ट्रक चालक, कार चालक आणि दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कार चालकाने अचानक दरवाजा (accident after suddenly opened door) उघडला. दुचाकीवरील मयत तरुण राम रस्त्यावर पडला. तेव्हा, भरधाव ट्रक खाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
Last Updated : Nov 16, 2021, 10:29 PM IST