दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं भर पावसात आंदोलन... पाहा व्हिडिओ - Bacchu Kadu - BACCHU KADU
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 25, 2024, 8:25 PM IST
मुंबई Bacchu Kadu : राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असताना, दुसरीकडं दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी भर पावसात आंदोलन केलय. प्रहार अपंग संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आकाशवाणी आमदार निवास ताब्यात घेतलं असून, जोपर्यंत सरकार तोडगा काढत नाही तोपर्यंत आंदोलन कायम राहणार असा इशारा, बच्चू कडू आणि प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारला दिला आहे.
दिव्यांगांच्या मागण्यासाठी जोरदार घोषणाबाजी : दरम्यान, आमदार निवासाच्या टेरेसपासून तळ मजल्यापर्यंत दिव्यांगांनी ताबा घेतला आहे. आमच्या 3-4 बैठका मुख्यमंत्री यांनी घेतल्या. घरकुल, पगारवाढ, दिव्यांग भवन, बोगस प्रमाणपत्रवर कारवाई आधी विषयांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठका झाल्या. मात्र, प्रशासन याकडं लक्ष देत नाही, असा आरोप बच्चू कडू यांनी केलाय. एकीकडं लाडक्या बहिणीला सरकार पंधराशे रुपये देत आहे त्याचं स्वागत आहे. मात्र, दुसरीकडं दिव्यांगाचे अनेक प्रश्न आहेत. याकडं सरकारनं लक्ष घालावं. जोपर्यंत दिव्यांगाचे प्रश्न सोडवले जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन कायम राहणार आहे अशी प्रतिक्रिया, बच्चू कडू यांनी दिली आहे.