जम्मू-काश्मीर Assembly Elections 2024 : जम्मू-काश्मीरच्या ऐतिहासिक तीन टप्प्यातील निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज (25 सप्टेंबर) शांततेत पार पडलं. दुसऱ्या टप्प्यातील सहा जिल्ह्यांतील 26 जागांसाठी आज मतदान झालं. 239 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झालय. मतदानाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
मतदानाचा टक्का घसरला : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. पहिल्या टप्प्यातील 24 जागांवर झालेलं 61.38% मतदान लक्षात घेता आजही चांगलं मतदान होईल, असं मानलं जात होतं. मात्र, मतदानाचा टक्का घसरला. श्रीनगरमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करताना जम्मू-काश्मीरचे मुख्य निवडणूक अधिकारी पी के पोळ म्हणाले, "दुसऱ्या टप्प्यात 54.11 टक्के मतदान झालं. मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडलं." दुसऱ्या टप्प्यातील मतदान पाहण्यासाठी परदेशी राजदूतांच्या 16 सदस्यीय शिष्टमंडळानं भेट दिल्याचं त्यांनी सांगितलं.
A group of foreign diplomats from various countries visited polling stations in Srinagar today to observe the election process, remarking on the professionalism and democratic spirit on display.
— G Kishan Reddy (@kishanreddybjp) September 25, 2024
This is the 'Naya Jammu & Kashmir'—a region that has transformed from being plagued… pic.twitter.com/STBfJu0Pj1
सर्वात कमी मतदान श्रीनगरमध्ये : जम्मू-काश्मीरमध्ये दुसऱ्या टप्प्यात संध्याकाळी 7 वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक 71.81 टक्के मतदान रियासी जिल्ह्यात तर सर्वात कमी 27.32 टक्के मतदान श्रीनगर जिल्ह्यात झाले. बडगाममध्ये 58.9 टक्के, गांदरबलमध्ये 58.81 टक्के, पुंछमध्ये 71.59 टक्के, राजौरीमध्ये 68.22 टक्के मतदान झालं.
Polling for #Phase2 elections across 26 Assembly Constituencies in Jammu-Kashmir commences at 7AM tomorrow!
— Election Commission of India (@ECISVEEP) September 24, 2024
Check out the facts at a glance for #JKAssemblyElections phase-2#VoiceYourChoice 🇮🇳 #ReadyToVote#Elections2024 #ECI pic.twitter.com/2hyVA5mzm5
तिसरा टप्पा 1 ऑक्टोबरला : यापूर्वी 18 सप्टेंबर रोजी निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला होता. त्यावेळी किश्तवाडमध्ये सर्वाधिक तर पुलवामामध्ये सर्वात कमी मतदान झालं होतं. आतापर्यंत दोन टप्पे पार पडले असून 40 जागांसाठी तिसरा आणि शेवटच्या मतदानाचा तिसरा टप्पा 1 ऑक्टोबरला पार पडणार आहे. यासह मतमोजणी ८ ऑक्टोबरला होणार आहे.
हेही वाचा
- जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक 2024 Phase 2; मतदानाला सुरुवात, परदेशी शिष्टमंडळ देणार भेट, भाजपा नेत्यांचा 'हा' दावा - JK ASSEMBLY ELECTIONS 2024
- जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक 2024 ; परदेशी शिष्टमंडळावरुन ओमर अब्दुलांची सरकारवर टीका - JK Assembly Election 2024
- कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात होणार चौकशी, उच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब! - MUDA Case