बैठकीनंतर मुख्यमंत्री 'लॉकडाऊन'बाबत घोषणा करतील - आरोग्यमंत्री - जालना शहर बातमी
🎬 Watch Now: Feature Video
जालना - शनिवारी (दि. 10 एप्रिल) झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर टास्क फोर्सला राज्यातील आढावा घेऊन लॉकडाऊनबाबात म्हणणे मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या होत्या. राज्यातील विविध शहरात खाटांची संख्या कमी असून रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन गरजेचे असल्याचे मत टास्क फोर्सच्या काही सदस्यांनी नोंदवले आहे तर काहींनी विरोध केला आहे. याबाबत मंत्रीमंडळाच्या पुढील बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनबाबत घोषणा करतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.