लॉकडाऊनच्या नियमांची पोलिसांकडून कडक अंमलबजावणी - Mumbai Corona Restrictions
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरामध्ये कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून लॉकडाऊन चे निर्बंध लादण्यात आलेले आहेत. 22 फेब्रुवारी रात्री 8 वाजल्यापासून ते 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंतचे निर्बंध हे नागरिकांना बंधनकारक असणार आहेत. रस्त्यावर विनाकारण धावणाऱ्या वाहनांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून कलर कोड चे नियम लावण्यात आलेले आहेत . पिवळा, हिरवा, लाल अशा कलर स्टिकर लावलेल्या अत्यावश्यक सेवेतील वाहनांना रस्त्यावर येण्याची परवानगी असल्यामुळे, मुंबईतील रस्त्यावर नेहमीपेक्षा वाहनांची संख्याही कमी पाहायला मिळालेली आहे. विनाकारण वाहनांना रस्त्यावर आणणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात मुंबईतील वाशी चेक नाका येथे पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे. वाशी चेक नका येथून या गोष्टीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी.