कोरोना विषाणूच्या रुग्णांवर उपचार करण्यास आरोग्य विभाग सज्ज - राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूने आता भारतात शिरकाव केला आहे. मुंबईत कोरोना विषाणूचे दोन रुग्ण आढळले आहेत. या दोन्ही रुग्णांना गुरुवारी रात्री पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा आजार नवीन आहे, त्यामुळे याचे निदान होणे महत्वाचे आहे. यावर निदान करण्याची व्यवस्था पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत (एनआयव्ही) आहे. त्यामुळे संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत पाठवले जाणार आहेत. संशयित रुग्णांवर पुण्यातील नायडू रुग्णालय आणि मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार करण्याची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य आरोग्य विभागाचे सर्व्हेक्षण अधिकारी प्रदीप आवटे यांनी दिली.
Last Updated : Jan 24, 2020, 8:04 PM IST