VIDEO : ST Worker Strike - औरंगाबाद आगारातील काही कर्मचारी कामावर रुजू - वैजापूर एसटी कर्मचारी कामावर परतले
🎬 Watch Now: Feature Video
औरंगाबाद - राज्यात गेल्या महिन्याभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST Workers Strike) सुरू आहे. या आंदोलनामुळे शेकडो कर्मचाऱ्यांना निलंबीतही करण्यात आले. तर दोन दिवसांपूर्वी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab On ST Workers Strike) यांनी कामावर रूजू झाल्यास निलंबन मागे घेऊ, असे परीपत्रक काढले होते. त्यामुळे काही कर्मचारी कामावर रुजू होत आहेत. औरंगाबाद आगारतही काही कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. या कर्मचाऱ्यांशी 'ईटीव्ही भारत'ने संवाद साधला.