मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील भीषण अपघाताचा थरारक VIDEO, दोन ट्रकमध्ये कारचा झाला चुराडा - horrific accident
🎬 Watch Now: Feature Video
रायगड - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 1 जुलै रोजी संध्याकाळी खोपोलीजवळील बोरघाटात कार व ट्रकचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि मुलगा असे तिघेजण जागीच ठार झाले होते. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहत असताना आपल्याला या अपघाताची तीव्रता लक्षात येते. ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटतो. आणि समोर चालत असलेल्या कारला हा ट्रक मागून जोराची धडक देतो. यात कारचा अक्षरशः चुराडा झाल्याचे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसते. तर समोर जाऊन तो ट्रक पलटी झाला. अपघाताचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
Last Updated : Jul 3, 2021, 2:31 PM IST