येवला पंचायत समितीत शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उभारली शिवस्वराज्य गुढी - येवला पंचायत समिती
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - येवला पंचायत समितीत शिवस्वराज्य गुढी उभारून शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते स्वराज्य गुढी उभारण्यात आली. स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन करण्यात आले. तसेच राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करुन गटविकास अधिकारी उमेश देशमुख सह अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. तालुक्यातील नगरसुल, ममदापूर सह अनेक ग्रामपंचायतीमध्ये शिवराज्यभिषेक सोहळा हा स्वराज्य गुढी उभारून साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, तलाठी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.