तिळाच्या लाडूंनी बनवा तुमची मकरसंक्रांत 'आरोग्यदायी' - तिळाचे लाडू रेसिपी व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
जळगाव - मकरसंक्रांतीला तिळाचे लाडू खातात. हे लाडू आरोग्यवर्धक असतात त्यामुळे हिवाळ्यात देखील हे लाडू नियमित खाल्ले जातात. त्यांची रेसिपी आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. सर्वात अगोदर गूळ बारीक किसून घ्यावा. त्यानंतर एका कढईत तीळ टाकून ते मंद आचेवर भाजून घ्यावेत. नंतर दुसऱ्या कढईमध्ये अर्धी वाटी पाणी घ्यावे. त्यात किसलेला गुळ टाकावा. मंद आचेवर गुळाचा पाक करून घ्यावा. गुळाचा पाक तयार झाल्यानंतर तो भाजलेल्या तीळांमध्ये टाकावा. हे मिश्रण एकजीव करावे. त्यानंतर लगेचच हाताला पाणी किंवा तेल लावून त्या मिश्रणाचे छोटे-छोटे गोल लाडू करावेत. अशा पद्धतीने तिळाचे लाडू तयार होतात.