बांधकाम सुरू असलेल्या चंद्रपूर मेडिकल कॉलेजमध्ये आग; कामगारांची चाळ जळून खाक - Chadrapur fire incident
🎬 Watch Now: Feature Video

चंद्रपूर - बांधकाम सुरू असलेल्या चंद्रपूर मेडिकल कॉलेजमध्ये मंगळवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास भीषण लागली. यात बांधकाम मजुरांसाठी अस्थायी पद्धतीने तयार करण्यात आलेली चाळ जळून राख झाली. सुदैवाने घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र, आग इतकी भीषण होती की आटोक्यात आणण्यासाठी काही तास लागले. यात सातत्याने गॅस सिलिंडरचे भीषण स्फोट होत असल्याने आग विझवायला मोठी अडचण जाणवत होती. मेडिकल कॉलेजचे बांधकाम शापूरजी पालन मिस्त्री या कंपनीला देण्यात आले आहे. कामगार जिथे राहतात तिथे इलेक्ट्रीकचे सामान कसे काय ठेवण्यात आले होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.