दुधाची रिकामी पिशवी द्या अन् हवे ते झाड घेऊन जा, कौतुकास्पद उपक्रम - पिंपरी-चिंचवड शहर बातमी
🎬 Watch Now: Feature Video
पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरात दुधाची रिकामी पिशवी द्या आणि झाडांची आवडती रोपे घेऊन जा, असा कौतुकास्पद उपक्रम राबवला जात आहे. इको फ्रेंडली फ्लोरा आणि एग्रीकोस गार्डन्स यांच्या सहयोगाने निनाद सोनवणे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे. झिरो प्लास्टिक, अशी या मागची संकल्पना असून गेल्या तीन दिवसांपासून उपक्रम सुरू झाला आहे. आत्तापर्यंत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून तब्बल दहा हजार दुधाच्या पिशव्यांचे संकलन करून नागरिकांनी आत्तापर्यंत सातशे रोप घेऊन गेल्याची माहिती निनाद सोनवणे यांनी दिली आहे.