बाळासाहेब ज्या लोकांच्या पायाला स्पर्श करायचे त्यापैकी बाबासाहेब एक होते; संजय राऊतांनी व्यक्त केली भावना
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर सर्व प्रेम करतात,ते आपल्याला सोडून गेले. ते फक्त स्वता समृध्द जीवन जगले नाही तर महाराष्ट्रला समृद्ध केलं. जो इतिहास लोकांपर्यन्त पोहोचला नव्हता तो त्यांनी पोहचवला. सेना परिवाराशी त्यांचा अत्यंत जवळचा संबंध होता. इतिहास लोकांपर्यन्त कसा पोहचावा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. बाळासाहेब आणि बाबासाहेब याचं नात वेगळं होते. बाळासाहेब ज्या लोकांच्या पायाला स्पर्श करत होते त्या पैकी एक बाबासाहेब होते. दोघांमधील नात अतूट होत. हा योगा योग आहे की बाळासाहेबांचा जाण्याचा दिवस 2 दिवसांवर आहे आणि आज बाबासाहेब निघून गेले, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.