ETV Bharat / entertainment

'अंत्यसंस्कारा'साठी मिळाली होती मोठी रक्कम, चंकी पांडे म्हणाला- "रडल्यास जास्त पैसे मिळणार होते" - CHUNKY PANDEY

अभिनेता चंकी पांडेनं अलीकडेच मजेशीर खुलासा केला की, त्याला अंत्यसंस्कारासाठी जाण्याचे पैसे मिळातात.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 2, 2024, 5:31 PM IST

Updated : Dec 2, 2024, 7:04 PM IST

मुंबई - प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता चंकी पांडेबद्दल अनेकदा म्हटलं जातं की तो खूप कंजूष आहे आणि पैसा हुशारीनं खर्च करतो. याबरोबरच तो अभिनयाशिवाय अनेक मार्गांनी वरकमाई करत असल्याचेही समोर आलं आहे. पण नुकताच त्यानं स्वतः असा खुलासा केला आहे, ते जाणून घेतल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल. त्यानं सांगितलं की, तो एकदा अतिरिक्त पैसे मिळणार म्हणून एक अंत्यविधीसाठी गेला होता. हा संपूर्ण प्रकार काय आहे हे जाणून घ्या.

चंकी पांडे नुकताच कपिल शर्मा शोमध्ये पाहुणा म्हणून आला होता. यात त्यानं एक मजेशीर गोष्ट सांगितली. चंकीनं सांगितले की, एक काळ असा होता की तो पैसे कमावण्यासाठी कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचा. एकदा तो अशाच पद्धतीनं अंत्यसंस्काराला पोहोचला होता. याविषयी बोलताना तो म्हणाला, "एक दिवस सकाळी मला एका आयोजकाचा फोन आला. त्यानं विचारलं सर तुम्ही सध्या काय करत आहात, मी म्हणालो मी शूटिंगसाठी निघालो आहे. तो म्हणाला, साहेब, वाटेत एक छोटासा कार्यक्रम आहे जिथं तुम्हाला फक्त 10 मिनिटांसाठी यावे लागेल, पैसे चांगले आहेत. मी म्हटलं ठीक आहे मी येतो. तेव्हा त्यानं मला पांढरे कपडे घालून यायला सांगितलं, म्हणून मी पांढरे कपडे घालून गेलो. तिथं पोहोचल्यावर कुणाचा तरी मृतदेह ठेवलेला दिसला."

चंकी पुढे म्हणाला, "जेव्हा मी मृतदेह पाहिला तेव्हा मला समजलं की मी अंत्यसंस्कारासाठी आलो आहे. याबाबत आयोजकांशी बोललो असता त्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही थोडे रडले तर तुम्हाला जास्तीचे पैसे मिळतील."

चंकी पांडेने 1987 मध्ये 'आग ही आग' या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी अनेक कॉमेडी आणि ड्रामा चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा विजय 69 हा चित्रपट अलीकडेच 8 नोव्हेंबर 2024 रोजी रिलीज झाला आहे. यामध्ये अनुपम खेर, मिहीर आहुजा यांसारख्या कलाकारांनी त्याच्याबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. तो आगामी 'हाऊसफुल 5' या चित्रपटातही झळकणार आहे. तो पुन्हा एकदा यात 'पास्ता' हे पात्र साकारत आहे.

Last Updated : Dec 2, 2024, 7:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.