गृहोद्योगाच्या माध्यमातून दिवाळी फराळाची विक्री.. त्याच पैशातून होते दिवाळी साजरी - लोकल फॉर व्होकल
🎬 Watch Now: Feature Video
दिवाळीनिमित्त अमरावती शहरात नामांकित उद्योग व्यावसायिकांसह लहान मोठ्या व्यवसायिकांच्या दुकानातही गर्दी उसळलेली दिसत आहे. शहरातील रामनगर परिसरात आस्वाद गृह उद्योग चालविणाऱ्या अश्विनी मठे यांनी दिवाळीच्या फराळाचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे. अकरा वर्षापासून त्या हा व्यवसाय करीत असून यावर्षी या ग्रुप उद्योगातून मिळालेल्या पैशातून त्यांच्या घरची दिवाळी साजरी होणार आहे. अकरावीत शिकणारा मुलगा आणि आठवीत शिकणाऱ्या मुलीची जबाबदारी त्यांच्यावर असून गृह उद्योगाच्या माध्यमातून आपल्या मुलांचे आयुष्य घडवत असतानाच त्यांच्या परिसरासह शहरातील विविध भागातील गृहिणी त्यांच्या दिवाळी फराळाला प्रतिसाद देत आहेत.
Last Updated : Nov 4, 2021, 10:05 AM IST