Hasan Mushrif : भाजपने दिला राष्ट्रवादीला पाठिंबा.. मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, 'चांगल्या कामाचा हा विजय'.. - भाजपने कोल्हापुरात राष्ट्रवादीला पाठिंबा दिला

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 7, 2022, 5:42 PM IST

मुंबई : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ( KDCC Bank Election 2022 ) नुकतीच पार पडली. त्यात काँग्रेस- राष्ट्रवादी आणि भाजपचा पॅनल असलेल्या शाहू पॅनलने वर्चस्व ( Shahu Panal Wins KDCC Bank Election ) राखले. तर विरोधी शिवसेनेला अवघ्या तीन जागा मिळाल्या. बँकेच्या चांगल्या कामाचा हा विजय असून, काम पाहूनच भाजपने पाठिंबा दिल्याची प्रतिक्रिया ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif On KDCC Bank Election ) यांनी दिली आहे. एकीकडे किरीट सोमय्यांमार्फत मुश्रीफ ( Kirit Somaiya On Hasan Mushrif ) यांच्यावर आरोप करायचे आणि दुसरीकडे मुश्रीफ यांच्या पॅनेलला पाठिंबा द्यायचा, ही भाजपची दुट्टपी भूमिका उघड पडल्याचे बोलले जात आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस - राष्ट्रवादी व भाजपच्या शाहू पॅनलने वर्चस्व राखले. तब्बल ११ जागांवर विजय मिळवला. तर महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रमुख घटक पक्ष असलेली शिवसेना शाहू पॅनल विरोधात लढली. शिवसेनेने तीन जागा जिंकल्या. याबाबत हसन मुश्रीफ यांनी आज मुंबईत प्रतिक्रिया दिली. सहा वर्षात शाहू पॅनेलने चांगलं काम केले. मतदारांचा विश्वास संपादन करण्याचे काम केले. आजचा पॅनलचा विजय त्याचेच मोठे यश आहे. या निवडणुकीत शिवसेनेने तीन जागा मागितल्या होत्या. परंतु दोन जागा देण्याचे आम्ही मान्य केले. शिवसेना मात्र तीन जागांवर ठाम राहिली. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येत शाहू पॅनल बनवले. भाजपने या पॅनलला बाहेरून पाठिंबा ( BJP Supports NCP In Kolhapur ) दिला. बँकेने गेल्या सहा वर्षात केलेले काम पाहून भाजपने पाठिंबा दिल्याचे मुश्रीफ म्हणाले. राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेकदा स्वभावाचे नारे दिले जातात. आत्ता झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसबरोबरच भाजपशी हातमिळवणी केली. त्यामुळे आगामी निवडणुका एकत्रित लढणार का? असा प्रश्न मुश्रीफ यांना विचारला असता, महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. आगामी निवडणुकाबाबत भूमिका एकत्रित बसून निर्णय घेऊ, असे मुश्रीफ म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.