'बार्ज पी-305' : अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्या भावना - तौक्ते चक्रीवादळ बचावकार्य
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-11832002-thumbnail-3x2-i.jpg)
मुंबई - तौक्ते चक्रीवादळामध्ये अरबी समुद्रात अडकलेल्या पी 305 बार्जमधील 188 कर्मचाऱयांवा वाचवण्यात आले आहे. चक्रीवादळाचा फटका ‘बॉम्बे हाय’ परिसराला मोठ्या प्रमाणात बसला होता. चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून पी-३०५ या बार्जचा नांगर वाहवत गेला आणि हे बार्ज समुद्रात भरकटले. यातील 188 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आले असून, अनेक कर्मचारी अद्यापही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम नौदलाकडून करण्यात येत आहे. बेपत्ता असलेल्या कर्मचाऱयांच्या नातेवाईकांनी त्यांच्या भावना 'ई टीव्ही भारत'कडे व्यक्त केल्या आहेत.