गावातच होतंय समस्यांचे निराकारण; 'राज्यमंत्र्याची राहुटी' मंत्री बच्चु कडूंचा अभिनव उपक्रम - राहुटी बच्चु कडू
🎬 Watch Now: Feature Video
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि राज्यमंत्री बच्चू कडू 'राज्यमंत्र्याची राहुटी' हा कार्यक्रम आपल्या गावात राबवत आहेत. 30 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या 15 दिवसांच्या कालावधीसाठी मतदारसंघात हा उपक्रम घेण्यात येत असून थेट मंत्री महोदय लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गावात पोहोचणार आहे. मतदारसंघातील 'शिरजगाव कसबा' या गावापासून या उपक्रमाला सुरुवात झाली. विविध शासकीय कागदपत्रांचे कामकाज एकाच मंडपात होणारा हा अभिनव उपक्रम सर्वच मंत्र्यांनी राबवावा ही अपेक्षा जनतेकडून आहे. यापूर्वी आमदार असतानाही बच्चु कडू यांच्याकडून हा उपक्रम राबवण्यात येत होता.
Last Updated : Jan 30, 2020, 9:06 PM IST