अंबानी आणि अदानींची भूक तरी किती आहे- राजू शेट्टी - राजू शेट्टी आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मुंबईत शेतकऱ्यांची केंद्र सरकार विरोधात आंदोलन सुरू आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना अदानी व अंबानींचे गुलाम बनवण्यासाठी कृषी कायदे मंजूर केले आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या घशात घातल्या जाणार आहेत. हे कायदे मागे घ्या, चर्चा करा मग बघू. केंद्राने केलेल्या कायद्याच्या विरोधात असून मोठ्या उद्योजकांसाठी हे कायदे आहेत. अंबानी आणि अदानी यांची भूक तरी किती आहे. का आम्हाला लुटायला, लुबाडणूक करायला का आलात? असा सवाल अंबानींना विचारायला आलो आहोत, असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.