तळई येथील घटना दुर्देवी; राज्यात अतिवृष्टी पलीकडे वृष्टी, पंतप्रधानांचे सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन - मुख्यमंत्री - पाऊस माहिती

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 23, 2021, 2:30 PM IST

मुंबई -मुंख्यमंत्र्यांनी राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यामुळे अतिवृष्टी पलीकडे वृष्टी होत आहे. राज्यात सर्व नेव्ही, एनडीआरएफ टीमचे युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे. राज्यातील काही धरणातील पाणी सोडवे लागणार आहे. त्यामुळे ते कुठे जाईल याची माहिती नाही त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना योग्य ठिकाणी हलवण्याचे काम सुरू आहे. सर्वत्र प्रशासनाला सुचना दिलेल्या आहे. डोंगर वस्त्यावरील, डोंगर कपारीतील नागरिकांना योग्य ठिकाणी हलवण्याचे काम सुरू आहे. पंतप्रधानांचा ही फोन आला होता. त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. असे मुख्यमंत्री यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. महाड तळई गावात दरड कोसळली आहे. यात जवळपास ५० ते ६० नागरिक अडकले असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यातील 35 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौैधरी यांनी दिली आहे. या ठिकाणी एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरू आहे. पूर आणि दरडी कोसळल्यामुळे पथकाला घटनास्थळी पोहचण्यास अडथळे निर्माण होत होते. त्यानंतर आज सकाळपासून बचाव कार्य सुरू आहे. यासह राज्यातील सर्व भागातील पूरपरिस्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी  घेतला आहे. त्यामुळे अतिवृष्टी पलीकडे वृष्टी होत आहे. राज्यात सर्व नेव्ही, एनडीआरएफ टीमचे युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.