जनता कर्फ्यू : ताज हॉटेल, गेट वेचा परिसर निर्मनुष्य - Mumbai news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक मुंबईकराने आपला सहभाग १०० टक्के देण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र मुंबईमध्ये पाहायला मिळाले. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जाणारे 'गेट वे ऑफ इंडिया' सोबतच ताज हॉटेलचा परिसर निर्मनुष्य असल्याचे पाहायला मिळाले. कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केल्यानंतर मुंबईकरांनी जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.