ओमायक्रॉनचा धोका टाळण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून तयारी - विठ्ठल मंदीर बातमी
🎬 Watch Now: Feature Video
पंढरपूर (सोलापूर) - देशासह राज्यावर कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या सावट गडद होत चालले आहे. दक्षिण भारताच्या राज्यातून येणाऱ्या भाविकांसाठी विठ्ठल मंदिर समितीने कठोर पाउले उचलली आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोरोना नियमांचे पालन विठुरायाचे दर्शन होणार आहे. त्यासंदर्भातील सर्व उपाययोजना विठ्ठल मंदिर समितीकडून करण्यात आल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्क बंधनकारक केले आहे. तर मंदिर समितीकडून मंदिर दोन प्रत्येक तासात सॅनिटायझर केले जात आहे. तसेच मंदिरातील सांस्कृतिक कार्यक्रमावर मर्यादा करण्यात आल्याची माहिती गुरव यांनी दिली आहे.