आमदार प्रताप सरनाईक यांची ईडी चौकशी तूर्तास नाही
🎬 Watch Now: Feature Video
आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, या चौकशीला उपस्थित राहता येणार नाही, असे त्यांनी कळविले आहे. बाहेरगावावरून आल्यामुळे ते होम क्वारंटाइन आहेत. त्याचप्रमाणे मुलगा विहंग सरनाईक यांच्या पत्नी आजारी आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामुळे पुढील आठवड्यात आपल्याला आणि विहंग सरनाईक यांना एकत्रितपणे चौकशीसाठी बोलवावे, अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी ईडी अधिकाऱ्यांना केली आहे.