ओबीसी कोट्यातील थोडेसेही आरक्षण मराठ्यांना देणार नाही - प्रकाश शेंडगे - obc vjnt sangharsh samiti mumbai
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - येथे आज (शनिवारी) ओबीसी, व्हीजेएनटी संघर्ष समितीकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे बोलत होते. ते म्हणाले, मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे, यासाठी आमचे समर्थन आहे. मराठा नेत्यांना आरक्षण मिळणार नाही, हे लक्षात आल्याने ते ओबीसी कोट्यातून आरक्षण मागत आहेत. मात्र, असा कोणताही प्रस्ताव सरकारने मंजूर करू नये. नाहीतर राज्यात उद्रेक होईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच आम्ही 'ओबीसी'चे जराही आरक्षण मराठ्यांना देणार नाही. त्यामुळे आम्ही ३ तारखेला राज्यभरात आंदोलन करणार आहोत. याची सर्व जबाबदारी सरकारवर असेल, असा इशाराही ओबीसी, व्हीजेएनटी संघर्ष समितीकडून देण्यात आला.