अस्थाई डॉक्टरांनी संपावर जाऊ नये, तुमची जनतेला खूप गरज - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यवतमाळ
🎬 Watch Now: Feature Video
यवतमाळ - राज्यातील अस्थाई डॉक्टरांनी संपाचा इशारा दिला आहे. यावेळी या सगळ्या अस्थाई डॉक्टरांनी कोरोनाच्या काळात मोठे काम केले आहे. आताही या कठीण परिस्थितीत या डॉक्टरांवर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे अस्थाई डॉक्टरांनी संपावर जाऊ नये, त्यांच्या मागण्यांसंदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलून त्यांच्या मागण्या राज्य सरकारने प्राधान्याने मान्य कराव्यात, असे सांगेन. त्यामुळे विनंती करतो की, डॉक्टरांनी संपावर जाऊ नये, असे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आज देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली यावेळी ते बोलत होते. राज्य सरकारने टाळेबंदीबाबत निर्णय घेतला आहे, मात्र अजून त्या संदर्भात स्पष्टता नाही, त्यामुळे यावर सद्या बोलणार नसल्याचे सांगितले. मोफत लसीकरणाबाबत सांगताना केंद्र सरकारने मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. देशात अनेक राज्यांमध्ये हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रमध्ये सुद्धा याबतचा निर्णय होऊ शकतो असे सांगितले.
TAGGED:
yawatmal corona news