VIDEO : लोअर परेल पुलावर कारचालकाचा निष्काळजीपणा; एका दुचाकीस्वाराचा मृत्यू, दुसरा जखमी - मुंबई अपघात लेटेस्ट न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : मुंबईतील लोअर परेल पुलावर झालेला एक अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. जे दृश्य पाहुन आपल्याला काळजाचं पाणी पाणी होईल. व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की दादरच्या दिशेने जात असताना एका कारचालकाच्या चुकीमुळे यू-टर्न घेताना बाईकस्वाराचा मृत्यू होतो. कारने अचानक यू-टर्न मारल्याने रोडवर असणाऱ्या दुचाकी चालकाचे संतुलन बिघडते आणि तो समोरच्या दिशेने पडतो. ज्यामुळे इतर दुचाकी चालकही खाली पडला. त्यानंतर दोघांनाही नायर रुग्णालयात नेण्यात आले, जेथे एक दुचाकी चालक भावेशचा मृत्यू झाला आणि दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे. 572/21 पेन 279, 337, 304 अ, भा पेन 184 134 अंतर्गत गुन्हा नोंदवून पोलीस पुढील तपास करत आहेत.