राज्यात दीड दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन, फिरत्या कृत्रिम तलावात विसर्जनाला सुरुवात - ganesh visarjan mumbai 2020 news
🎬 Watch Now: Feature Video
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच प्रदूषण टाळण्यासाठी श्री गणेश विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्याविषयी आवाहन करण्यात येत आहे. आज पश्चिम उपनगरातील के पूर्व पालिका विभागात ट्रकमध्ये तयार केलेले फिरते कृत्रिम तलाव जागोजागी ठेवण्यात आले आहेत. या कृत्रिम तलावात भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. फिरत्या स्वरूपातील या कृत्रिम तलावाच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी नागरिक दिलेल्या वेळेवर गणेशमूर्ती घेऊन विसर्जनासाठी येत आहेत. भाविक त्यांच्याकडील गणेश मूर्ती शिस्तबद्ध पद्धतीने नेमलेल्या स्वयंसेवकांच्या हाती विसर्जनासाठी देत आहेत. गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देऊन आपल्या घरी जड अंतकरणाने परतत आहेत. फिरत्या कृत्रिम तलावाच्या ठिकाणी पालिकेचे स्वयंसेवक व पोलीस योग्य ती खबरदारी घेऊन गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी मदत करताना पाहायला मिळत आहेत.