सारथी संस्थेची घोडचूक; ''शिवजयंती' वक्तृत्व स्पर्धेच्या बॅनरवर नजरचुकीने छापला संभाजी महाराजांचा फोटो' - shivaji maharaj jayanti banner mistake
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ( shivaji maharaj jayanti ) 19 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने सारथी संस्थेने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. यासाठी सारथी संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर या स्पर्धेबाबत बॅनर डिझाईन प्रसिद्ध केले गेले. मात्र या डिझाईनच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐवजी शिवाजी छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो प्रसिद्ध केल्यामुळे संभाजी ब्रिगेडकडून या गोष्टीचा निषेध नोंदवला आहे. शिवजयंती निमित्ताने सारथी संस्थेकडून ऑनलाइन 'वक्तृत्व स्पर्धा' ठेवण्यात आलेले आहेत. सदर वेबसाईट आणि सारथी संस्था राज्य सरकारची आहे. राज्य सरकारच्या अधिकृत संस्थेकडून अशी चूक होणे योग्य नाही. हा प्रकार अत्यंत चुकीचा आणि संतापजनक आहे. सारथी संस्थेने तात्काळ चूक दुरुस्त करावी आणि छत्रपती संभाजी महाराज ऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो प्रसिद्ध करावा, असे संतोष शिंदे प्रदेश संघटक, संभाजी ब्रिगेड ( sambhaji brigade on sarathi Institute ) यांनी सांगितले.
Last Updated : Feb 9, 2022, 4:36 PM IST