Omicron variant : नवीन व्हेरिएंट रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमा बंद करणे गरजेचे - नवाब मलिक - corona cases in state
🎬 Watch Now: Feature Video
महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली असून आघाडी सरकारने या दोन वर्षांमध्ये जनतेशी बांधिलकी ठेवली. शेतकरी तसेच सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल याबाबत राज्य सरकारने नेहमीच आग्रही भूमिका राहिली असल्याचे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक म्हणाले. राज्य सरकारला दोन वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी दोन वर्षांमध्ये राज्य सरकारने केलेल्या कामांचा आढावा दिला.
नवीन व्हेरीएंट रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमा बंद करणे गरजेचे -दक्षिण आफ्रिकेमध्ये नवीन व्हेरिएंट (Omicron variant) सापडल्याने जगभरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा व्हेरिएंट आपल्या देशात येण्यापासून रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमा बंद करणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भावाची सुरुवात जेव्हा देशात झाली होती त्यावेळेस हा निर्णय घेण्यास उशीर झाल्याने त्याची किंमत देशाला मोजावी लागली होती. त्यामुळे आता तरी केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय सीमा लवकरात लवकर बंद कराव्यात, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. पब-पार्टीला कोण असतं याची आमच्याकडे माहिती -
महाविकास आघाडी सरकार म्हणजे पब, पेग, पार्टी आणि पेंग्विन अशी टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर केली. या टीकेचा समाचार अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी घेतला असून पब आणि पार्टी कोण आणि कोठे करते याबाबत आम्हाला सर्व माहिती आहे. वेळ आल्यावर याबाबत आम्ही सांगू अशी खोचक प्रतिक्रिया नवाब मलिक दिली आहे.