thumbnail

By

Published : May 13, 2021, 1:05 PM IST

ETV Bharat / Videos

बारामतीत उत्साहात परिचारिका दिन साजरा

बारामती- मागील दीड वर्षांपासून कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे देश संकटात सापडला आहे. या संकट काळात देशाला डॉक्टरांबरोबरच खऱ्या अर्थाने मदत झाली ती आरोग्य कर्मचाऱ्यांची. देशभरातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी देशातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून कार्य केले व अद्याप करत आहेत. अनेकदा या आरोग्य कर्मचाऱ्यांना स्वतःच्या घरातील सुख दुःखाच्या प्रसंगी सहभागी होता आले नाही. समाज हेच कुटुंब समजून आरोग्य कर्मचारी अहोरात्र अद्यापही सेवा बजावत आहेत. जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून बारामतीत परिचारिका दिन साजरा करण्यात आला, याबाबत घेतलेला हा आढावा.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.