निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई; 20 लाख रुपयांची रोकड जप्त - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
🎬 Watch Now: Feature Video


Published : Nov 4, 2024, 5:02 PM IST
बुलढाणा : सध्या राज्यात सध्या विधानसभा निवडणूक 2024 ची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रात विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला (Maharashtra Assembly Election 2024) निवडणुका होणार आहेत, तर मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे. तसेच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलीस (Buldhana Police) अॅक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय. सध्या ठिकठिकाणी चेक पोस्ट लावण्यात आली असून, पोलीस प्रत्येक वाहनाची तपासणी करीत आहे. याच संदर्भात बुलढाणा शहर पोलिसांनी बुलढाणा शहरातील कारंजा चौक येथे वाहन तपासणी करताना स्कुटीच्या डिक्कीतून 20 लाखांची रोकड जप्त केलीय. तातडीने पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेतली असून, संबधित व्यक्तीची चौकशी सुरू केलीय. तसंच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रोफेशनल डीवायएसपी वंदना कारखेले यांनी दिलीय.