बंडखोरी टाळण्यासाठी भाजपाची काय आहे रणनीती? गिरीश महाजन यांनी स्पष्टचं सांगितलं - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/04-11-2024/640-480-22823270-thumbnail-16x9-girish-mahajan.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Nov 4, 2024, 2:20 PM IST
जळगाव : मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगावमधील जनसंपर्क कार्यालयात जिल्ह्यातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार स्मिता वाघ या देखील उपस्थित होत्या. बैठकीदरम्यान गिरीश महाजन यांनी बंडखोरी टाळण्यासाठी सर्वतोवरी प्रयत्न करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, "महायुतीनं उभ्या केलेल्या अधिकृत उमेदवारांच्या व्यतीरिक्त जिल्हा आणि राज्यात बंडखोरी करणाऱ्यांना समजावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात आम्हाला नक्कीच यश मिळेल. बंडखोरी रोखण्यासाठी देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसह आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. लोकसभेतील निकाल बघता आम्ही कुठंही रिक्स घेणार नाही. मागील दोन-तीन दिवसांपासून आमचं सर्वांशी बोलणं सुरू आहे. राज्यात भाजपाच्या काही लोकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले आहेत. ते सर्व माघार घेतील. कोणत्याही मतदारसंघात बंडखोर होऊच नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत", असं महाजन म्हणाले.