कोल्हारवाडीत दीपावली पाडव्यानिमित्त रंगल्या रेड्यांच्या टक्करी; पाहा चित्तरथरारक व्हिडिओ - BULL FIGHT
🎬 Watch Now: Feature Video


Published : Nov 3, 2024, 6:19 PM IST
बीड : राज्यात दिवाळी सण (Diwali 2024) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरात भाऊबीजच्या दिवशी कोल्हारवाडी गावात रेड्यांची टक्कर (Bull Fight) लावण्यात आली होती. गेल्या तीस वर्षापासून ही परंपरा चालू आहे. स्पर्धेमध्ये राज्यातील अनेक भागातील रेडे सहभागी झाले होते. श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या टक्करी पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी केली होती. तर या टक्करीमुळं ग्रामीण भागातील रेड्यांना महत्त्व प्राप्त होतं. त्याचबरोबर पशुपालन हा व्यवसाय देखील यामधून वाढत चालला असल्याचं पाहायला मिळत आहे.
बैलगाडा शर्यत : बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापूर्वीच बैलगाडा शर्यत ठेवली होती. या बैलगाडा शर्यतीत इतर राज्यातील बैलांनी देखील सहभाग घेतला होता. या बैलगाडा शर्यतीत बकासुर नावाच्या बैलानं ट्रॅक्टरचं बक्षीस जिंकलं होतं.